Sindhudurg: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये हृदयरोग तज्ञ डॉक्टर निर्मला सावंत रुजू

0
551
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये हृदयरोग तज्ञ डॉक्टर निर्मला सावंत नुकत्याच रुजू

प्रतिनिधी: अभिमन्यू वेंगुर्लेकर

सावंतवाडी – सावंतवाडी राजा शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने हृदयरोग तज्ञ डॉक्टर निर्मला सावंत यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. तसेच बालरोग तज्ञ संदीप सावंत यांचाही सत्कार करण्यात आला करण्यात आला. डॉ.निर्मला सावंत ह्या मूळच्या सावंतवाडीच्या रहिवासी आहेत. त्यांचे शिक्षण मुंबई येथील जे. जे. शासकीय रुग्णालय येथे झाले.
जे जे रुग्णालयामध्ये त्यांनी हृदयरोगतज्ञ ही पदवी प्राप्त करून जे. जे. रुग्णालयामध्ये काही वर्ष अनुभव घेऊन त्यानंतर कोल्हापूर (इचलकरंजी) येथे खाजगी रुग्णालयामध्ये काही वर्ष सेवा बजावली.त्यानंतर त्यांनी पाच वर्षांपूर्वी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांची सेवा बजावली होती. काही घरगुती अडचणीमुळे त्यांना रीझाईन द्यावं लागलं होतं. सध्या स्थितीमध्ये रुग्णांच्या तपासणीसाठी त्यांचं खाजगी क्लिनिक मच्छी मार्केट जगन्नाथराव भोसले शाळा नंबर 3 च्या समोर आहे.तरीहि त्या उपजिल्हा रुग्णालय मध्ये ऑन कॉल हृदयरोग तज्ञ म्हणून सेवा बजावणार आहेत.https://sindhudurgsamachar.in/sindhudugr-2022-23-या-सत्रातील-जिल्हास्त/

यामध्ये हृदयविकार ,उच्च रक्तदाब, मधुमेह ,अनेक प्रकारच्या गंभीर तापाचे रुग्ण तपासणार आहेत. शासकीय रुग्णालयामध्ये त्यांच्या तपासणीची वेळ 11:30 ते 1:30 पर्यंत राहील.
सामाजिक बांधिलकी व राजा शिवाजी चौक मित्र मंडळ रुग्णांना सोयी सुविधा मिळण्याकरिता नेहमी पुढाकार घेत असतात .सहा महिन्यापूर्वी सामाजिक बांधिलकीच्या पुढाकारातून उपजिल्हा रुग्णालय परिसरातील खराब झालेला रस्ता नवीन करण्यात आला होता. तसेच अमृत महोत्सवाला हॉस्पिटला 75 टेबल्स दिली, त्याचप्रमाणे स्ट्रेचर, व्हील चेअर यांची दुरुस्ती करून दिली होती. आज राजा शिवाजी मित्र मंडळाच्या वतीने महिलांना कपडे चेंज करताना किंवा रुग्ण गंभीर असताना कर्टनची कमतरता भासत होती ही गंभीर समस्या व त्यामुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन या मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर ,सामाजिक बांधिलकीचे माजी नगरसेवक संजय पेडणेकर व रवी जाधव यांनी महिला वार्ड साठी कर्टन उपलब्ध करून दिला.राजा शिवाजी चौक मित्र मंडळ व सामाजिक बांधिलकी अशा प्रकारचे समाज उपयोगी अनेक उपक्रम शहरामध्ये राबवत आहेत. त्यांच्या या सेवाभावी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सर्पमित्र-महेश-राऊळ-द/


याप्रसंगी डॉ. वज्राटकर सर डॉ. डॉ. संदीप सावंत, सागर जाधव ,डॉ.लादे सिस्टर सिस्टर वॉर्ड बॉय तसेच शिवाजी चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष बंटी माठेकर, उपाध्यक्ष विजय पवार, बंड्या तोरस्कर, सचिव दीपक सावंत, महादेव राऊत, रत्नाकर माळी, प्रदीप नाईक, संजय साळगावकर उमेश खटावकर, वासुदेव खानोलकर, माझी माजी नगरसेविका शुभांगी सुकी, शुभम मळकाचे तसेच सामाजिक बांधिलकीचे संजय पेडणेकर व रवी जाधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here